चॉकलेट फॅक्टरी

Facebook Memory : August 21, 2015

कधी कधी कंटाळा येऊन असे वाटते की नोकरी-बिकरी सगळं सोडुन द्यावे… काही तरी नवीन, innovative, हटके काम करावेसे वाटते. पण परत तोच गहन प्रश्न की नोकरी सोडुन कसे चालेले?
यावर एकच मार्ग आहे!
विली वोंकाच्या फॅक्टरीत नोकरी मिळवायची.. उंपा-लुंपा बनुन.. परफेक्ट वर्क एन्व्हार्यमेंट वगैरे काय असते ते इथेच मिळणार!
सगळे कामगार कसे एक सारखे दिसणारे, बोलणारे, वागणारे. एकमेकांशी वाद नाही, पोलिटिक्स नाही. मस्त समूहगायन करत, ताल धरत काम करायचे. जॉब प्रोफ़ाईल्स पण किती आहेत ना..! चॉकलेट ढवळण्याचे काम करण्यापासून पार टेलीपोर्टर मशीनपर्य़ंत सगळ काही.
विली वोंकासाठी काम करणे आणि चॉकलेट फॅक्टरीत काम करण्यापेक्षा मोठे job satisfaction काय असेल!?

चॉकलेट फॅक्टरीत काम करण्यापेक्षा मोठे job satisfaction काय असेल!?

चॉकलेट फॅक्टरीत काम करण्यापेक्षा मोठे job satisfaction काय असेल!?

सुर्योदय

सुर्योदय

सुर्योदय

हिच वेळ आहे ती, नेहमीचीछळवणुक करणारीशांततेची वेळमन अस्वस्थ करणारी काळोखी वेळ..

मध्यरात्र उलटुन गेल्यानंतरची, पहाटेच्या आधीची, मधेच कुठेतरी अडकलेली

अंधार्‍या रात्रीची वेळ, स्वप्न पहाण्याची वेळ.. कालच्या स्वप्नांचे काय झाले याचे दु:ख न मानणारी वेळ.. स्वप्नच ती, काय होणार अजुन त्यांच

वर्तमान विसरवणारी, भुतभविष्यात रमवणारी ही वेळ

सगळे हिशोब मांडले जातात इथे यावेळी. अगदी जुनीपुराणी बालपणीच्या खेळातला डाव ते आजपर्य़ंत नशीबाने खेळलेले डाव. जवळच्यांना रडवलेल्या गोष्टी, अनोळखींना हसवलेल्या गोष्टी.. सरसकट सर्व गोष्टी जमाखर्चाप्रमाणे आजुबाजुला मांडली जातात आपोआप.. तशीच विरुन जातात आपोआप

बाकी उरते शून्य.. पोकळी.. अफ़ाट पोकळीशांत, अस्वस्थ, काळोखी पोकळी

ही पोकळी फ़ुटते, शांतता भंगते, अस्वस्थता गायब होते, काळोख मिटतो, हिशोबाचा कागद नवा कोरा होतो आणि स्वप्नांना खर करण्यासाठी वर्तमानात आणुन सोडतोसुर्योदय…!

बेरात्र

रुममधल्या ट्युब्लाइटने ग्यालरीत पडण्याऱ्या चन्द्रप्रकाशाची काही व्हॅल्युच नाही ठेवली असे म्हणुन उगाच ग्यालरीत आलो.
​बराच वेळ इथच बसलोय .

रात्रीचे तीन-साडेतीन वाजुन गेलेत. गेले काही तास टॉप फ्लोअरच्या रुममधे गरम होतय म्हणुन गॅलरीत बसलोय, बिना कामाचा, बिना विचारांचा, बिना स्वप्नांचा, बिना उद्देश्याचा, बिना झोपेचा… आता जाणवले की बेरात्र झाली…

एका वाऱ्याच्या झुळूकेसोबत रातराणी फ़ुलांचा मंद वास आला का तसा भास झाला हे समजलेच नाही. गॅलरीतुन वाहणारा छान गार वारा ऊन्हाळ्याची जाणीव करुन नाही देते पण नुकतीच पोर्णिमा होवुन गेलेला डोक्यावरच्या ऑलमोस्ट पुर्णचंद्राने ही रात्र बेरात्र झाल्याचे केव्हाच सांगितले होते.

समोर दुरवर चौदा-पंधरा मजली उंच चार इमारतींचे बांधकाम अजुन चालू आहे. त्याच्या बाजूला असलेल्या एका इमारतीतून सात-आठ गाड्या नाईट ड्रोप साठी बाहेर पडल्या. अशाच प्रकारच्या काही गाड्या ग्यालरीखालच्या रोडपर्यंत येवुन यु टर्न मारुन परतल्या. त्यांचा पुढच्या ​कोपऱ्यापर्यंत भुंकून भुंकून नेटाने पाठलाग करणारी कुत्र्यान्ची टोळीसुद्धा या बेरात्री थोडीशी थकल्यासारखी वाटते आहे.
एरवी संध्याकाळी चमकणारी आजूबाजूची घरे अशा बेरात्री अंधार माखुन मलूल झालेली पहिल्यांदाच जाणवली.
रुममध्ये चालू असलेली रोकिंग गाण्याची प्लेलिस्ट केव्हाच संपली त्याबरोबरच मित्र आणि त्याचा लपटोप दोघेही स्लीप मोड वर गेलेले होते. गाणी संपल्यानंतर बेरात्रीची शांतता बराच वेळ अनुभवली.
शेवटी ही शांतता मोडली ती पक्षांच्या किलबिलाटाने. झटकन पूर्व क्षितीजावरच्या ढगाला पिवळा केशरी रंग आणि अगदी शेजारी असलेल्या उंच निलगिरी झाडाला हिरवा मिळाला. पूर्ण बेरात्र अपूऱ्या चंद्रप्रकाशात असलेल्या सगळ्या गोष्टी आता अजून उजळत निघाल्या…
ग्यालरीतून रुममध्ये आलो तेव्हा सूर्यप्रकाशाने ट्युब्लाइटच्या प्रकाशाची काही व्हॅल्युच नाही ठेवली!

Two ISS sightings today evening

There are Two ISS sightings today evening

Data is collected from SATELLITE SIGHTING INFORMATION  and exact Az/Alt is taken from Stellarium software.

Location entered in Stellarium: Pimpri – Latitude N 18° 37′ 12.00″ Longitude E 73° 48′ 0.01″

1.

First is quite difficult to catch because maximum elevation in sky is 14°. Although time interval shown is about 8 minutes, it won’t be visible for whole 8 minutes.  Light pollution and tall buildings in city may block view of horizon. If you have clear sky you can get to watch both pass-by for couple of minutes.

Event Time Altitude Azimuth Altitude in Km
Approach 18:08 3° – just above horizon 180° – exact South 407
Maximum elevation  in the sky 18:12 14° above horizon 123° – somewhere between South and East 403
Departure 18:16 3° – just above horizon 71° – between East and North 401

2.

Looking at timings and watching Stellarium I can say, as soon as bright Venus touches horizon at West, ISS will approach from same direction.

Event Time Altitude Azimuth Altitude in Km
Approach 19:45 6° – just above horizon 251° – near West 403
Maximum elevation  in the sky 19:48 21° above horizon 318° – somewhere between West and North 401
Departure 19:51 6° – just above horizon 11° -near North 399

Try to watch and greet ISS.

ISS pass over Pune this evening

Space, Sky is divine… to which ancient man was very very fascinated. The unlimited expanse in which everything is located and today’s man has caught over it. International Space station, a station which completed man’s dream to live in space..!

I always had a cherished desire to fly in the sky……

Continue reading