Hazaaron Khwaishein Aisi

Hazaaron Khwaishein Aisi

Hazaaron Khwaishein Aisi

मोस्टली आपण सगळे कसे सेल्फ सेंट्रीक असतो ना? स्वत:चे काम, शिक्षण, करीअर, प्रोमोशन्स, पैसाअडका, रीलेशनशिप्सनातलग, सख्खे, जवळचे मित्रमैत्रीणी वगैरे.. इथवरच. अशा आपोआप तयार झालेल्या चोकटीच्या आत. चोकट पूर्वी म्हणायचे आजकाल याला सर्कल म्हणतात. तर आपण सगळे आपाआपल्या सर्कलच्या आत सुखी राहण्याचा प्रयत्न करत असतो. सुखाच्या व्याख्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या. पण आपल्यातलेच काही जण सेल्फ सेंट्रीकपणा थोडा बाजुला सारून इतरांच्या सर्कलमधे डोकावतात, त्यांच्या सुखादु:खाच्या संकल्पना समजून घ्यायचा प्रयत्न करतात. एका सर्कलमधली गरजदुसर्‍या सर्कलमधे चैन“…! काही सर्कल्स मधे बेसिक सुख कधी नव्ह्तेच..! असे जेव्हा कळते तेव्हा मात्र समाजिक लेव्ह्लवर बदल केले पाहिजेत असे वाटते. जगात समता हवी, विषमता नको.

असे बदल केले पाहिजेत हे पूर्वीच्या लोकांनासुद्धा वाटले असेल. त्यांनी आपापल्या परीने काही विचार मांडले. मग सगळ्यांनी सर्कल मोठे करा, सर्कलच ठेवू नका, सगळ्या सर्कल मधे समानता पाहिजेत एक ना अनेक विचारधारा निर्माण झाल्या. आपणही अजाणतेपणी अशा विचारांना फोलो करत असतो तर काही जण एक विचारधारेला घट्ट धरुन वि हॅव टु चेंज द वर्ल्डच्या मागे लागतात. क्रांतिरेव्हेलुशन आणण्यासाठी धडपड करतात. कुणी पूर्ण आयुष्य वेचत या कामात तर कुणी काही वर्ष, तर कुणाला विचार पटतात पण करु काहीच शकत नाही.

विक्रमचे वडील गांधीवादी असतात. त्याला वाटते की वडीलांच्या विचासरणीमुळे त्याचे कुटुंब मध्यमवर्गीय आहे. त्याला मोठ व्हायचे असते. तसा तो होतोही नंतरच्या काळात. अशक्य डील शक्य करु शकणारा असे त्याचे नावही होते राजकारणी आणि बिझनेसमन लोकांमधे.

सिद्धार्थ वर डाव्या विचारसरणीचा प्रभाव असतो. मुळापासुन बदल केले पाहिजेत आणि आपण स्व:त याची जवाबदारी उचलली पाहिजे. तो सोबतच्या मित्रांनाही हे विचार पटवुन देतो. ऐनवेळेस बरेच जण माघार घेतात. पण सिद्धार्थ जेवढे सोबत आहेत त्यांना घेवून चळवळीत उडी घेतो. बिहारमधल्या छोट्या गावात जाउन सुधारणांचे काम चालू करतो. यासाठी त्याचे सर्वस्व देतो. या चळवळीला कधी हिंसात्मक वळण लागल्यामुळे पोलिस सतत त्याच्या मागे लागलेले असतात.

या दोघांना गिता नावाची मुलगी आवडत असते. गिता विक्रमला चांगला मित्र मानत असते आणि ती सिद्धार्थच्या प्रेमात असते पण त्याच्यासोबत जायला नकार देते कारण तिला परदेशात जाउन शिक्षण घ्यायचे असते. काही वर्षांनंतर आयएएस अधिकार्‍याशी लग्न करते कालांतरने त्याला सोडूनही जाते. ती परत सिद्धार्थला भेटून त्याच्या कामात मदत म्हणून प्रैढ साक्षरता वर्ग चालवते. तिचे आयुष्य मात्र बरेच चित्रविचित्र वळण घेत जाते.

तिघांची सुरुवात दिल्लीतल्या कॉलेजपासून होते आणि पिक्चरचा शेवटाला तिघे तीन टोकाला पोहोचतात. खुप रोचक प्रवास आहे या तिघांच्या जीवनाचा! या सगळ्यांची कॅरॅक्टर्स हे आपल्याच समाजातील वेगवेगळे सर्कल्स आहेत, कॉलेजातल तारुण्य आहे, कहीतरी करण्याची इच्छाशक्ति आहे, विषमता आहे.

के के मेननचे काम नेहमी सारखे मनात ठसते. शायनी अहुजा पण परफेक्ट वाटतो. चित्रांगदा सुंदर आहेच आणि तिने कामही बेस्ट केले आहे.

स्वानंद किरकिरेची गाणी आणि शांतनू मोइत्राचे म्युझिक या सोबतील तोड नाही. बावरा मन माझे सगळ्यात आवडते गाणे आहे.

आर्टस आणि सिनेमॅटोग्राफी छान आहे हे पूर्वार्धात प्रकर्षाने जाणवते. मनाला भिडणारी गोष्ट म्हणजे विक्रमगितासिद्धार्थ यांच्यातील पत्र व्यवहार! सुधीर मिश्रांचा हज़ारों ख्वाहिशें ऐसीनक्की बघा, खुप वेगळा आहे!

Leave a comment