सुर्योदय

सुर्योदय

सुर्योदय

हिच वेळ आहे ती, नेहमीचीछळवणुक करणारीशांततेची वेळमन अस्वस्थ करणारी काळोखी वेळ..

मध्यरात्र उलटुन गेल्यानंतरची, पहाटेच्या आधीची, मधेच कुठेतरी अडकलेली

अंधार्‍या रात्रीची वेळ, स्वप्न पहाण्याची वेळ.. कालच्या स्वप्नांचे काय झाले याचे दु:ख न मानणारी वेळ.. स्वप्नच ती, काय होणार अजुन त्यांच

वर्तमान विसरवणारी, भुतभविष्यात रमवणारी ही वेळ

सगळे हिशोब मांडले जातात इथे यावेळी. अगदी जुनीपुराणी बालपणीच्या खेळातला डाव ते आजपर्य़ंत नशीबाने खेळलेले डाव. जवळच्यांना रडवलेल्या गोष्टी, अनोळखींना हसवलेल्या गोष्टी.. सरसकट सर्व गोष्टी जमाखर्चाप्रमाणे आजुबाजुला मांडली जातात आपोआप.. तशीच विरुन जातात आपोआप

बाकी उरते शून्य.. पोकळी.. अफ़ाट पोकळीशांत, अस्वस्थ, काळोखी पोकळी

ही पोकळी फ़ुटते, शांतता भंगते, अस्वस्थता गायब होते, काळोख मिटतो, हिशोबाचा कागद नवा कोरा होतो आणि स्वप्नांना खर करण्यासाठी वर्तमानात आणुन सोडतोसुर्योदय…!

Leave a comment