पुण्यातील हौशी खगोलनिरिक्षकानीं एकत्र यावे – अरविंद परांजपे

Members of JVP, Akashmitra and Khagol Vishwa with Arvind Paranjpye. Photograph by: Bhushan Joshi

सोमवारी (५ डिसे, २०११) ’आयुका’चे विज्ञान-प्रसार अधिकारी अरविंद परांजपे यांच्या निरोप समारंभावेळी पुण्यातील हौशी खगोलनिरिक्षक एकत्र जमले होते. “पुण्याचा झपाट्याने होत असल्याने, सर्वसमान्य लोकांपर्यंत खगोलशास्त्र पोचविण्यासाठी हातात हात घेवून काम करण्याची गरज आहे.” असे प्रतिपादन परांजपे यांनी केले. त्याची नियुक्ति नेहरु तारागंणाच्या (मुंबई) संचालकपदी झाली आहे.
’आयुका’चे गुलाब देवांगन यांनी परांजपे यांच्या कामाचा आढावा घेतला व त्याचे आभार मानले. ’आयुका’चे संचालक अजित केंभवी याचा संदेश त्यानी वाचून दाखविला.
पुणे, पिंपरी-चिंचवड मधील संस्था प्रथमच एका ठिकणी जमल्या होत्या. ज्योतिर्विद्या परिसंस्था (JVP) ही भरतातील सर्वात जुनी संस्था पुण्यात कार्यरत असून संस्थेचे श्री जोशी यांनी JVP आणि परांजपे यांच्या सुरवातिचया काळातील आठवणी सांगितल्या. “सर्वात जुनी संस्था म्हणुन JVP एकत्र येण्याच्या उपक्रमाला सर्वोतोपरी मदत करेल” असे ते म्हणाले.
फर्गुसन कॉलेजच्या  Physics विभागाच्या सौ दाभाडे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि कॉलेजच्यावतीने परांजपे यांचा सत्कार केला.
टेलिस्कोप बनाविण्याची कार्यशाला आयोजित केल्याबद्दल C-DAC च्या आशीष कुवेलकर यांनी परांजपे यांचे अभिनन्दन केले.
खगोल विश्वच्या (KV) सुरवातीच्या काळात परांजपेंनी कसे सहकार्य केले याबद्दल मयुरेश प्रभुणे यांनी सांगितले. “खगोल विश्व ला यावर्षी बारा वर्षे पूर्ण झाली. कोणत्याही संस्थेचे तपपुर्ती वर्ष हे महत्वाचे समजले जाते. त्यामुळे संस्थेच्या या वर्षी ठरलेल्या उपक्रमात महाराष्ट्रातील हौशी खगोल निरिक्षकांचा मेळावा आयोजीत करण्यात येणार आहे. याच निमित्ताने आपण सर्व एकत्र येउन काम करुया”, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार समीर धुर्ढे यानी केले.

Leave a comment