सलाम बॉम्बे!

Salaam Bombay!

Salaam Bombay!

बर्‍याचदा पिक्चरचा शेवट गोड, गुण्यागोविंदाने, happily lived ever afterने केला असेल कि कस बर वाटत. चटका लावणारी शोकांतिका वगैरे असेल तर बरेच दिवस तो शेवट मनात रेंगाळत राहतो. पण जर सांकेतिक/अर्धवट शेवट केला असेल ना तर कळतच नाही काही. कथानक लिहिणार्‍याने आणि डायरेक्टरने ठरवुन असे विचित्र शेवट बनवले की कसेतरीच वाटते. लावा काय अर्थ लावायचा तो आपल्या सोयीने, समजुन घ्या कथेच्या ’फ़्लो’नुसार. डोक्याला शॉट! मग मला कुठेतरी वाचुन, कोणाशी तरी बोलुन, ऐकुन curiosity शांत करावी लागते.

असाच एक फार प्रचंड आवडता पिक्चर ’सलाम बॉम्बे!’. लई वेळा पाहिला. दर वेळेस नवीन वाटतो. दर वेळेस एखादी बारीकसा prop नजरेस पडतो आणि मन खुश होवुन जाते. गोष्टीची सुरुवात होते ती गावाबाहेर असलेल्या अपोलो सर्कशीच्या तंबु उतरवण्याने. सगळे लोक आवराआवरी करत असतात. तिथला एक बालकामगार अकरा वर्षाचा मुलगा क्रिश्नाला मालक गावातुन पानमसाला आणायला पाठवतो. तो जाऊन परत येतो तोपर्यंत सर्कशीचा गोतावळा निघुन गेलेला असतो. रेल्वे स्टेशनला जाऊन ’बडे शेहेर’ जाण्यासाठी तिकीट घेतो आणि बॉम्बेला पोहोचतो. चहाच्या टपरीवर कामाला लागतो तेव्हा त्याचे चायपाव. बॉम्बेतले भिकारी, रस्त्यावररेल्वे स्टेशनवर राहणारी मुले, वेश्या, वेश्यागृह, वेश्यांची लहान मुले, त्यांचे चार पैसे कमावण्याचे धंदे, ड्रग्ज व्यवसायिक, त्या व्यसनात पुर्ण बुडालेले गरीब लोक, बालसुधारगृह यासगळ्यानी बनलेला आणि त्याच्या भोवतालचा समाजात चायपाव त्याच्या सच्च्या, धोकेबाज मित्रमैत्रिणींसोबत कसा survive करतो. लहान मुलांना कोणत्या निरनिराळ्या tragedy मधुन जावे लागते हे बघण्यासारखे आहेखिळवुन ठेवतो पिक्चर एकदम.

दिग्दर्शक मिरा नायरने रस्त्यावर राहणार्‍या मुलांना घेवुन त्यांना प्रशिक्षण देवुन चित्रपटात घेतले. लोकेशन्स म्हणजे मुंबईतले रेल्वे स्टेशन, वेश्यागृह, दफनभुमी, भरपुर रहदारीचे रस्ते, चिल्लररुम, ड्रग्जवाल्याचे सगळे अगदी खरखुरं. सॅंडी सिसिलने एक नंबर फोटोग्राफी केली आहे आणि एका बालकलाकाराला दत्तकसुद्धा घेतले. सुनी तारापोरवाला हिनी मिरा नायरसोबत कथा आणि संवाद लिहिले आहेत.

लिहिण्याचे कारण एवढच की ड्युयल ओडिओवाली फाइल डाऊनलोड केलेली. एक ट्रॅक नोर्मल पिक्चर दुसर्‍या ट्रॅकमधे पुर्णवेळ मिरा नायर बोलते. कथा कशी लिहली, शुट कुठे आणि कशा परिस्थीत केले. ऐनवेळेस छोट्या कामासाठी crew ला उभे करुन काम करवुन घेतलेले किस्से. फंड्स उभे करणे, लहान मुलांना स्वत:च्याच घरात ठेवुन घ्यावे लागले आणि गणपति उत्सवातले शुटिंग सारखी अवघड काम कसे केले वगैरे हे सर्व डिटेल्स टच करतात. मला कित्येक दिवस चित्रपटाच्या शेवटातुन काय अर्थ काढावा काय बोध घ्यावा कळतच नव्ह्ते. पण मिरा नायरच्या बोलण्यातुन खुप सोप्या आणि सहज रितीने कळाले.

अ‍ॅवार्ड्स आणि nominations खुप मिळालेत सलाम बॉम्बे! ला. चार गोष्टींसाठी नक्की बघा सलाम बॉम्बे! मुंबई, मिरा नायर, नाना पाटेकर आणि चित्रपटाचा शेवट!

Advertisements

One thought on “सलाम बॉम्बे!

  1. कमाल सिनेमा. सुंदर लेख. नाना साठी कित्येक वेळा पाहिलेला हा सिनेमा आज पुन्हा डोळ्यासमोर आला. धन्यवाद पऱ्या.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s