सावलीचे ज्ञान

अलेक्झांड्रिया शहरापासुन काही अतंरावर नाईल नदीवरील असलेल्या बेटावर – सायईन (आताच्या ईजिप्त मधील आस्वन) गावात २१ जुनच्या मध्यान्ही एक अजब घटना घडते. देवळातील खांबांच्या सावली गायब दिसेनाशा होतात. इतर दिवशी कायम सावलीत असणार्‍या विहिरीत त्यादिवशी खोलवर सूर्यकिरण पोहचतात. साल कदाचित इ.स. पूर्व तिसरे शतक संपतानाचे असेल. ’एरिटोस्थेनीस’ याला सायईन मधील अशा घटनांची माहिती कळाल्यावर त्याने २१ जुनला स्वतः अलेक्झांड्रियातुन निरीक्षणे घेतली. तिथे मात्र सावल्या गायब होत नव्हत्या. सूर्याने क्षितीजाशी केलेला कोन (Gnomon) नोमोनच्या साह्याने मोजला. वर्तुळाचा पन्नासावा भाग असे निरीक्षण त्यास मिळाले. (त्यावेळेस अंश हे एकक नव्हते.) यावरुन अलेक्झांड्रिया आणि सायईन यामधील अंतरास पन्नासने गुणुन त्याने पृथ्वीच्या परीघाची आकडेमोड केली. आज काहींच्या मते त्याने काढलेले उत्तर फक्त दोन टक्क्याने चुकले.

एरिटोस्थेनीस इसपू २७६ ते इसपू १९५

एरिटोस्थेनीस
इसपू २७६ ते इसपू १९५

एरिटोस्थेनीस (लै बाप माणुस!!) हा खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ज्ञ, कवी, संगीताचा समीक्षक, भुगोलाचा अभ्यासक होता. त्या काळी अलेक्झांड्रियामधे प्रचंड मोठे ग्रंथालय होते. एरिटोस्थेनीस हा तिथला मुख्य ग्रंथपाल होता. कर्कवृत्तवर असणार्‍या सायईन ह्या गावावर सूर्य २१ जुनला असतो याची माहिती त्याला होती यावरुन असे कळते की सूर्याच्या भासमान भ्रमणाचेही ज्ञान त्यास होते. पृथ्वी सपाट नसुन गोल आहे असे त्याने सिद्ध केले. अक्षांश, रेखांशाची संकल्पना त्यानी मांडली. कॉसमॉस मालिकेतील पहिल्याच भागात कार्ल सेगन इसवी सनपूर्व काळातील अशा अफाट ज्ञानाचे अशा प्रकारे वर्णन करतो कि ते एकुन अंगावर शहारे येतात. काय अभ्यासु, द्रष्टा माणुस होता तो!

observing zero shadow

चिंचवडगाव, पुणे येथुन घेतलेले झीरो शॅडो ची छायाचित्रे

कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यान ज्या ठिकाणी सूर्य डोक्यावर असतो म्हणजेच  ज्या ठिकाणी सूर्याची किरणे लंब पडतात त्या ठिकाणी त्या क्षणाला (दुपारी – local noontime) कोणत्याही वस्तुंची सावली “बाजुला” पडत नाहीत. यालाच “झीरो शॅडो” असे नाव प्रचलित झाले आहे. वर्षातुन अशी स्थिती दोनदा होते.

पुणे आणि आसपासच्या परीसरात अशी स्थिती १३ मे ते १५ मे च्या दरम्यान कधीतरी एकदा होते. दुसर्‍या वेळेस मात्र मॉन्सुनचे ढग असल्याने झीरो शॅडो बघयला मिळत नाही.

 Date Declination of Sun Geo Location
13 May 2013 +18° 18′
14 May 2013 +18° 33′ Pune 18° 31′ N, 73° 55E
15 May 2013 +18° 47′
16 May 2013 +19° 01′ Mumbai 18° 55′ N, 72° 54’E Ahmednagar 19°07’N, 74°46’E

http://goo.gl/VSj44 – अरविंद परांजपे यांनी भारतातुन झीरो शॅडो बघता येणार्‍या ठिकाणांची यादी आणि विविध रंजक प्रयोगांची माहिती दिली आहे.

Anthony Abreu http://goo.gl/0HvlL ब्लॉग वर एरिटोस्थेनीस केलेल्या गणिताची आणि इतर संदर्भांची इंग्रजीतुन सविस्तर माहिती आहे!

चाला तर मग आपणही अशा लपलेल्या सावलींचे निरीक्षण करुया!

Advertisements

4 thoughts on “सावलीचे ज्ञान

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s