ek tha Tiger

Ek_Tha_Tiger_theatrical_poster

Ek Tha Tiger theatrical poster: YashRaj Films

यश-राज फिल्म्सने बर्‍याच नामवंत नायक, नायिकांना सोबत घेवून चित्रपट बनविले आणि त्यातील बरेच गाजलेसुध्दा. गेल्या चार दशकांमधे यश-राज फिल्म्सने कित्येक नवीन कलाकारांना आपल्या बॅनरमुळे नावारुपास आणले, जे आधीच मोठे स्टार होते, त्यांच्या ’स्टारडम’मधे अजुन भर घातली. बॉलीवुडचा प्रसिध्द अभिनेता सलमान खान याने पहिल्यांदा यश-राज बरोबर ’एक था टायगर’ या चित्रपटात काम केले आहे. सलमानने गेले काही चित्रपट अक्षरश: स्वत:च्या जीवावर यशस्वी करुन दखवले आहेत, पण यावेळेस मात्र असे काही घडले नाही.

शेणॉय (गिरीश कर्नाड – मी पहिल्यांदा यांचे काम पाहीले.) हे RAW मधे ऑफिसर असतात आणि त्यांचा आवडता माणुस टायगर (सलमान खान) हा भारताचा गुप्तहेर असतो. देशा-विदेशात कामगिरीसाठी शेणॉय टायगरला पाठवत असतात. निर्णय घेताना बुध्दीचा वापर करावा, हृदयाचा नाही (हे प्रत्येक चित्रपटांत असते) अशी शिकवण शेणॉयनी गुप्तहेरांना दिलेली असते. एके दिवशी शेणॉय टायगरला सांगतात की त्यांनी कामाच्या जवाबदारीमुळे प्रेमाला तिलांजली दिली. त्या काही प्रसंगात कळते कि टायगर एकटा रहात असतो. परदेशात जिथे जिथे कामगिरीवर जाईल तिथे हणामारी करुन शत्रुला जिवानिशी मारुन टाकत असतो. (इथे बाष्कळ अ‍ॅक्शन सीन बघायला मिळतात.) घरी आला कि, त्याच्या आजुबाजुला रहणार्‍या सगळ्या महिला त्याच्यावर लट्टु असतात. (इथे थोडेफार हसायला मिळते.)

आयर्लंडच्या एका महाविद्यालयात एक निवृत्त भारतीय शास्त्रज्ञ (रोशन सेठ – भारत एक खोज मधले!) काम करत असतात. त्यांच्याकडुन क्षेपणास्त्रांची माहिती चोरीला (कि विक्रीला यात मला confusion आहे.) जाणार असल्याची माहिती मिळाल्यावर टायगर तिथे जातो. शास्त्रज्ञच्या घरी काम करणार्‍या झोयाशी (कॅटरीना) ओळख झाल्यावर सलमान डायरेक्ट तिच्या प्रेमात पडतो! टायगरचा साथीदार गोपी (रणवीर शोरे) त्याला वारंवार कामात लक्ष दे असे सांगत असतो. इथे काही विनोदी प्रसंग आहेत. पण हसायला येता नाही कारण ऑलरेडी हे प्रसंग प्रोमो मधे रीलीज केलेत! (yes #Facepalm) प्रेमात एक-दोन गाणी येउन जातात. एका रोमॅंटीक सीन मधे टायगर झोयाला उल्का दाखवतो! (तेही चंद्र दिसत असताना! हा “विनोद” खगोल-अभ्यासकांना नक्की आवडेल 😀 )

मध्यंतरापर्यंत गोष्ट थोडीतरी चांगली आहे, पण नंतर ’कायच्या काय’ होवुन जाते. झोया पाकीस्तानच्या ISI ची एजंट असते. ती गुप्त संदेश पाठवुन टायगरला इस्तंबुल येथे होणार्‍या आंतराष्ट्रीय बैठकीस बोलावुन घेते. तिथे ते एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली देतात पण समाज आणि RAW, ISI मान्यता देणार नाही म्हणुन कोणालाही न सांगता तिथुन पळुन जातात. मग शेणॉय आणि ISI ची लोक त्यांचा पाठलाग करु लागतात. नायक-नायिकेची जोडी देशाटन करत फिरते आणि सिनेमा संपतो. like ” and they lived happily ever after” (होय, खरच संपतो एकदाचा!)

शेवटी शेवटी एका पाठोपाठ एक Action प्रसंग येतात. विनोदाला जेवढे हसु येत नाही तेवढे serious action scence ला हसु येते. काही गोष्टी खुप unrealistic आहेत झोया आणि टायगर प्रत्येकी ४-५ गुडांना/पोलिसांना बेदम मारतात. हणामारी करताना एका इमारतीवरुन दुसर्‍या इमारतीवर उड्या मारत फिरतात. भारतातल्या गोपीला जसे काही परदेशातले रस्ते माहित असतात म्हणुन तो कार चालवतो. झोयाला विमान उडवता येत असते. टायगरला गोळी लागलेली असताना तो बाईक चालवत उडणारे विमान पकडतो! (this one is epic #Fail) चित्रपटातले बरेच प्रसंग, डायलॉग अक्षरश: predictable आहेत. e.g. (डायलॉग – जिंदा या मुर्दा । प्रसंग – टायगर झोयाला गोळी मारत नाही, शेणॉय टायगरला हृदयापासुन शुभेच्छा देतात आणि इतर अनेक.)

शेवट वाईट केला आहे. सलमानची विशेष काहीच जादु नाही. कॅटरीनाची हिंदी जरी त्रास देत नसली तरी अभिनय ठिकठाकच आहे. रणवीर आणि कर्नाड हे मस्त अभिनेते आहेत.  गाणी विनाकारण येतात. युरेशीयातील आणि इतर काही ठिकाणी  चित्रीकरण झाल्यामुळे लोकेशन्स छान आहेत. (Surprise) सध्द्या सारखे वाजणारे माशाल्ला हे गाणे चित्रपटात नाहीचे. एकुणच कबीर खान दिग्दर्शीत ’एक था टायगर’ जाम बोर आहे. तरी सुध्दा ७५ कोटी खर्च करुन बनविलेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी ३१.२५ कोटी (विकीपेडियाची माहिती) कमावले आहेत!!!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s