महिला अंतराळवीर मार्शा आयविन्स

अवकाशप्रेमींना नेहमीच अंतराळवीरांच्या आयुष्याविषयी खुप उत्सुकता असते. काही महिन्यांपुर्वी माजी अंतराळवीर मार्शा आयवीन्स या भारतभेटीवर असताना त्यांनी आयुका येथे पुण्यातील लोकांशी संवाद साधला. अमेरीकेच्या नासामधुन निवृत्त झालेल्या मार्शा यांनी ३६ वर्षे जॉनसन स्पेस सेंटर मधे काम केले आणि याच दरम्यान त्या पाच वेळा अंतरळात जाऊन आल्या. मीर स्पेस स्टेशनची मोहीम, आंतराष्ट्रीय स्पेस स्टेशन याची उभारणी आणि अवकाशातुन उपग्रह सोडणे अशी महत्वाकांक्षी कामे त्यांनी पार पाडली.

Veteran Astronaut Marsha Ivins

आयुका येथे पुण्यातील लोकांशी संवाद साधताना महिला अंतराळवीर मार्शा आयविन्स

पंधरा देशांनी एकत्र येवुन बांधलेला आंतराष्ट्रीय स्पेस स्टेशन हे जमीनीपासुन ४०० किमी उंचीवरुन पृथ्वीच्या प्रदक्षीणा घालत असते. इतक्या उंचीवरुन पृथ्वी कशी आणि किती नयनरम्य दिसते हे मार्शानी चित्र आणि चलतचित्र याच्या माध्यमातुन दाखविले. भारत आणि मुम्बईची अवकाशातुन काढलेली छायाचित्रे त्यांनी दाखविली. त्यावेळेस त्या म्हणाल्या, “’तुम्ही जेव्हा अवकाशातून पृथ्वी पाहता, तेव्हा तुम्हाला देशांना अलग करणाऱ्या कोणत्याही भौगोलिक सीमा दिसत नाहीत. उलट सर्व पृथ्वी एकसंध असल्याचे दिसते. हे मोठे रमणीय दृश्य असते.”.

स्पेस स्टेशन मधे रहात असतानाची अंतराळवीरांच्या दिनचर्येची त्यांनी माहिती दिली. गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे तेथे असणार्‍या लोकांना वजनरहित अवस्थेत सर्व कामे पार पाडावी लागतात. स्टेशनच्या आत एका ठिकाणाहुन दुसर्‍या ठिकाणी ते अक्षरशः उडत जातात. पण काम करताना स्थीर रहण्यासाठी ते स्वतःला बांधुन घेतात. त्यासाठी ठिकठिकाणी बेल्ट्ची व्यवस्था आहे. तेथील वस्तु जागेवर राहण्यासठी वेलक्रो चा वापर केला जातो. गुरुत्वाकर्षणाच्या प्रदीर्घ अभावामुळे शरीरतील स्नायु कमजोर होतात, ( loss of bone mass.) म्हणुन त्यांना रोज २ तास व्यायाम करणे सक्तीचे आहे. पळण्याचा सराव, वेटलिफ्टिंग करण्यासठी तेथे खास उपकरणे आहेत. तेथील अंघोळ फार रंजक आहे. पाण्याचा मोठया चेंडुने शरीर ओले करुन साबण लावायचे मग परत पाण्याच्या चेंडुने शरीर स्वच्छ करयचे. दात स्वच्छ करायची टुथपेस्ट गिळली तरी चालते! रशियाने दिलेले स्वच्छतागृह गेल्या ३० वर्षांपासुन उत्तम रितीने काम करीत आहे. झोपण्यासाठी खास बॅग असतात. स्वतःची नियमीत कामे, स्पेस स्टेशनची कामे व शास्त्रीय प्रयोग अशी वेगवेगळी जवाबदारी त्यांच्यावर असते.

“ISS” मधे खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. साधारण दर सहा महिन्याने पृथ्वीवरुन “ISS” ला अन्नपुरवठा केला जातो. अमेरीकेने पाठवलेल्या पाकीटांतुन हवा आणि पाण्याचा अंश काढुन घेण्यात तर रशिया डबाबंद प्रकारात पुरवठा करते. मीठ आणि मीरपुड द्रव स्वरुपात असते. पेयांमधे विविध रसांचा समावेश असतो. Peanut butter आणि मधाचा मोठ्या प्रमाणात सेवन होते. जेव्हा नवीन माल येतो तेव्हा अंतराळवीर ताज्या फळांचा आनंद लुटतात.

आंतराष्ट्रीय स्पेस स्टेशन -  अवकाशवीर पाण्याच्या थेंबाशी खेळताना

आंतराष्ट्रीय स्पेस स्टेशन – अवकाशवीर पाण्याच्या थेंबाशी खेळताना

एक्स्ट्रा वेहिक्युलर अ‍ॅक्टीविटी म्हणजे स्पेसवॉक करण्यासाठी अंतराळवीरांना स्टेशनच्या बाहेर येताना विशिष्ट कपडे परिधान करावे लागतात. या स्पेससुट्मधुन त्यांना प्राणवायुचा पुरवठा केला जतो. बाहेर काम करण्यासाठी लागणारी हत्यारे आणि उपकरणे ठेवण्याची व्यवस्था त्यात असते. अंतराळवीरांना यांत्रिक हाताने किंवा विशेष प्रकरच्या दोरीने धरुन ठेवलेले असते. हे बंधन जर तुटले आणि जर अंतराळवीर स्टेशनपासुन दुर झाला तर तो परत कधीच परतु शकत नाही. हे टाळण्यासाठी स्पेससुटमधे “जेट”ची सुविधा असते जेणेकरुन विलग झाल्यास ते परत स्टेशनकडे उडत येउ शकतील.

आयविन्स यांच्या म्हणण्यानुसार अंतराळातील जीवन कधीच कंटाळवाणे नसते, परंतु तेथे एकाच वेळेस बरीच कामे करवी लागतात, इतरांना मदत करण्यास कायम तत्पर रहावे लागते.

उपस्थीत लोकांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले कि, अवकाशात बरेच दिवस राहिल्यामुळे माणसाच्या पाठीच्या कण्याची लांबी वाढलेली असते, त्यामुळे पृथ्वीवर परतल्यावर त्याचा त्रास संभावतो. पृथ्वीवर उतरल्यावर लगेचच चालताना तोल ढळु जातो पण कालांतराने जमीनीवरील वातावरणाची सवय होते.

एका प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या, “सहा महिन्यात मंगळावर असलेल्या रोबोट्स जे काम केले ते करण्यास माणसाला १० मिनिटात करता येईल परंतु मानवाला परग्रहावर पाठविणे फार धोक्याचे आणि खर्चिक आहे”. भविष्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “आपण चंद्रावरती तळ बनविला पाहिजे. तिथे पृथ्वीवर परत न येता स्वतःची काळजी घेण्याचे शिकले पाहिजे, तसे तंत्रज्ञान विकसीत केले पाहिजे. त्यानंतर ३ वर्षे कालावधी असलेली मंगळावर माणुस नेउन आणण्याची मोहिम हाती घेता येईल. यासाठी अजुन शक्तिशाली आणि वेगवान यानांची गरज भासेल. त्यानंतर आपल्या पुढे सुर्यमालेबाहेरील मंदाकिनी आणि इतर अनेक आकाशगंगा आहेतच”.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s