The Artist

द आर्टिस्ट

ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट फिल्म बघायला मजा येतेच पण जर तो मूकपट असेल तर.., प्लस तो फ्रेंच लोकांनी बनविला असेल तर, क्या बात हे! 🙂

NFAI येथे  यावेळेस “ढीगाने” नामांकने कमावलेला आणि पुरस्कार जिंकलेला ’द आर्टिस्ट’ बघायाला मिळाला.

तसे पाहायला गेलं तर गोष्ट वेगळी आहे; तरीही साधी, सोपी आणि भारतीय सिनेमा बघणार्‍यांना तर लगेच अंदाज लावता येण्यासरखी आहे. शॉर्टमधे सांगायचे तर – गोष्ट आहे एका कलाकराची जो हॉलिवूडमधे मूकपटांत नट म्हणून काम करत असतो. १९३० च्या काळात चित्रपट निर्मितीत होणार्‍या बदलांमुळे त्याची घुसमट होते आणि त्यातून बाहेर पडायाला त्याची प्रेमिका कशी मदत करते हे रंजकपणे, विनोदी अंगाने मांडले आहे.

सिनेमाची सुरुवातच होते ती ’जॉर्ज व्हॅलेंटाइन’ (Jean Dujardin) प्रमुख भुमिकेत असलेल्या एका मूकपटाच्या स्क्रिनींगने (खरच मजेशीर दृश्ये आहेत). नंतर जॉर्ज एके ठिकाणी फोटोग्राफर लोकांना ’पोज’ देत उभा असतो. तेवढ्यात चाहत्यांच्या गर्दीतून एक तरुणी- ’पेपी मिलर’ (Bérénice Bejo) चुकुन त्याच्या पुढ्यात येते. दुसर्‍या दिवशी एका वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर त्या दोघांचे फोटो येतात. त्यानंतर पेपी Extras साठी ऑडीशन द्यायला जाते, त्याठिकाणी डांसर म्हणून तिची निवड होते. किनोग्राफ नावाच्या स्टुडीओत जॉर्ज आणि पेपीची भेट होते. जॉर्ज पेपीला काम देण्यासाठी स्टुडीओच्या मालकाला गळ घालतो.  पेपीची एक वेगळी ओळख असावी म्हणून जॉर्ज तिच्या गालावर तीळ बनवितो. (ते तीळ ती कायम सांभाळते) पेपी जरी extra असली तरी जॉर्जला तिच्यासोबत असलेल्या scene ला बर्‍याचदा ’रीटेक’ द्यावे लागतात. कदाचित ह्याच काळात त्यांचे सूर जूळतात. पेपीला पुढे चांगली कामे मिळ्तात.

काही वर्षांनी कीनोग्राफ स्टुडीओ मूकपटांची निर्मिती बंद करून बोलपट बनविण्यास सुरुवात करतात. जॉर्जला बोलपटांची कल्पना आवडत नाही. तो स्वतंत्रपणे एका मूकपटाची निर्मिती करण्यास सुरुवात करतो. संपूर्ण कमाई त्यात लावतो. पेपी मुख्य भुमिकेत असलेला बोलपट आणि स्वत: मुख्य भुमिकेत असलेला जॉर्जचा मूकपट एकाच दिवशी प्रदर्शीत होतो. अर्थात जॉर्जचा मूकपट चालत नाही. १९२९ ला स्टॉक मार्केट कोसळते आणि जॉर्जचे दिवाळे निघते. त्याची बायको त्याला सोडून जाते. जॉर्ज त्याच्या नोकरासोबत एका छोट्या घरात रहायला जातो.

जॉर्जच्या वस्तूंचा लिलाव होतो. तो नोकराला कामावरून काढून टाकतो (बघण्यासारखा scene) . पेपीचे बरेच बोलपट गाजतात. जॉर्ज दारू-सिगारेटच्या आहारी जातो. तो पेपीचा एक बोलपट बघतो. तिथे खुप हसतोही. घरी दु:खी, चिडलेल्या अवस्थेत तो त्याच्याजवळ्च्या सर्व फिल्मच्या रीळ जाळतो. आग चांगलीच पेट घेते आणि जॉर्ज धुरामुळे बेशुद्ध पडतो. त्याचा कुत्रा पोलिसाला बोलावतो आणि त्याचा जीव वाचवितो. पेपीला ही बातमी कळाल्यावर ती जॉर्जला स्वता:च्या घरी नेते.

आता पेपी कीनोग्राफ स्टुडीओच्या मालकाला धमकी देते त्याने जॉर्जला काम द्यावे नाहीतर, तीसुद्धा काम करनार नाही. (विनोदी scene)

इकडे जॉर्जला कळते की लिलावातील सर्व वस्तू पेपीने विकत घेतल्या.. उद्वीग्न मनस्थितीत तो स्वत:च्या घरी जतो आणि आत्महत्येचा प्रयत्न करतो. पेपी तेथे पोहचून त्याला थांबविते. ते दोघे मिळून शूटींगसाठी नाचतात. येथे दोन डायलॉग येतात आणि सिनेमा संपतो.

अनेक दृश्ये स्मरणात राहतात.

कुत्र्याच्या अफलातून करमती आहेत. जॉर्जला एक स्वप्न पडते ते खुप भारी दाखवले आहे. एका दृश्यात जॉर्ज दारु पिताना दाखवला आहे, तो कॅमेराचा अ‍ॅंगल भारी आहे. दुसर्‍या एका दृश्यात जॉर्जची प्रोजेक्टरवरची सावली…

२२FPS असल्यामुळे त्याकाळचा फीलसुद्धा छान येतो.

खुप पोझिटीव्ह गोष्टी आहेत या सिनेमात.

हा सिनेमा बर्‍याच गोष्टी “न बोलता” दाखवतो.

कलाकारचे आयुष्य दाखवतो.. नशीब, चढ-उतार दाखवतो. पाळीव प्राण्याचे माणसावरील प्रेम, नोकराचे मालकारील प्रेम, केलेल्या मदतीची कृतज्ञता ठेववी. सर्वात महत्वाचे शिकवतो – बदलाला सामोरे जावेच लागते.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s